राम टोटल बॉडी चेक अप आणि डॉ. राहुल व्यास यांचा उपक्रम; १३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मिळणार लाभ
जळगाव (प्रतिनिधी) – आजच्या धावपळीच्या जीवनात मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाबासारख्या (Blood Pressure) आरोग्य समस्या वाढत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासणी आवश्यक असते, परंतु अनेक तपासण्या सामान्य नागरिकांना खर्चिक वाटू शकतात. हीच गरज लक्षात घेऊन, जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरातील राम टोटल बॉडी चेक अप आणि डॉ. राहुल व्यास यांच्या सहकार्याने एक विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
तपासणीमध्ये कोणत्या सुविधा मिळणार?
दिनांक १३ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत रुग्णांसाठी खालील महत्त्वपूर्ण तपासण्या संपूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत:
रक्त शर्करा (Blood Sugar) तपासणी
हिमोग्लोबिन (Hemoglobin)
कोलेस्टेरॉल (Cholesterol)
उंची (Height) आणि वजन (Weight)
बॉडी मास इंडेक्स (BMI)
वेळ आणि स्थळ
तपासणीची वेळ: दररोज सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत. मोबाईल नंबर 9822548780
स्थळ: राम टोटल बॉडी चेक अप, भास्कर मार्केट, चांडक हॉस्पिटल मागे, जळगाव.
या मोफत आरोग्य तपासणी सेवेचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रभू व्यास यांनी केले आहे.









