राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : महाराणा प्रतापसिंह स्मारक, जळगाव येथे महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज यांचे ४६ व्या अवतरण दिनानिमित्त राष्ट्रीय राजपूत करणी सेना,पत्रकार संघ ,राजपूत परिवार टीम खान्देश, मित्र परिवार यांचे वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी समाजातील मान्यवर व विशेष प्राविण्य व पुरस्कार प्राप्त मान्यवर यांचा सत्कार सोहळा पार पडला. प्रसंगी राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, महाराणा प्रतापसिंह स्मारक समिती प्रमुख उदयसिंह पाटील, पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, राजपुताना प्रीमियर लीगचे प्रणेते संग्रामसिंह सुर्यवंशी, साई कारचे संचालक विनोद शिंदे, विशाल सुरेश भोळे, कवाडे गटाचे अध्यक्ष कल्पेश मोरे, राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग प्रमुख विलास सिंह पाटील, जिल्हा प्रमुख महेंद्र सिंह राजपूत प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच, कार्यक्रमासाठी विठ्ठलसिंह मोरे, भगवानसिंह खंडालकर, रोशन राजपूत, विकास राजपूत, पृथ्वीराज फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश सिंह राजपुत, जामनेर येथील महाराणा प्रतापसिंह उत्सव समिती प्रमुख विश्वजित सिंह सिसोदिया. केसरिया प्रतिष्ठान प्रमुख डी. एस. पाटील, नामदेव महाराज, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कैलास सिंह पाटील, संजय सिसोदे, आशिष राजपूत, अभिजित राजपूत, भैय्या पाटील, प्रदीप राजपुत वडजी, अशोक चव्हाण, सुप्रीम कॉन्ट्रॅक्टर मित्र परिवार, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.