जळगाव – येथील गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ७५ दात्यांनी रक्तदान केले.
गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स् गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील, रक्तपेढीचे प्रमुख डॉ नितीन भारंबे यासह कर्मचारी वर्ग उपस्थीत होता. मेडीकल हबमधील पाचही आरोग्य विज्ञान विदयापिठाच्या ७५ विदयार्थ्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा डॉ. उल्हास पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.