जळगाव (प्रतिनिधी ) – समता नगर येथे आयोजित रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिर हे रेड प्लस ब्लड बँक आणि समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समता नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते तरुण आणि जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 42 बॅग रक्तदान केले. त्यात तरुणांचा मोठा सहभाग होता. त्यात आशुतोष बहुउद्देश्य प्रतिष्ठान सर्व पदाधिकारी, समता समाज मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, जनकल्याण युवा फाउंडेशनच्या पदाधिकारी उपस्थित होते. रेड प्लस चे पदाधिकारी अमोल शेलार, वीरेंद्र बिराडे, सुरज पाटील, ज्योत्स्ना मोरे, शिवदास राठोड, राहीब शेख आदी. उपस्थित होते.







