मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज १० हजार कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव टाकणारे यांनी केली.
राज्यात जून ते ऑक्टोबर पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहुन अधिक क्षेत्रावरील शेती पिकांच नुकसान झाले या नैसर्गिक संकटामुळे बांधीत झालेल्या शेतरकऱ्यांना 10 हजार कोटीचे अर्थ सहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले , अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.