जळगाव, मुंबई, यवतमाळ, नागपूर, नाशिकला प्रत्येकी ३ मंत्रीपदे
नागपूर (विशेष वृत्तसेवा) :- राज्याच्या नवीन मंत्रिमंडळाचा रविवारी दि. १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे शपथविधी पार पडला आहे. या मंत्रिमंडळात राज्यातील २० जिल्ह्याना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. तर उर्वरित १६ जिल्ह्याना मात्र पुढील अडीच वर्षानंतर संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वाधिक मंत्रीपदे हि पुणे व सातारा जिल्ह्यांना प्रत्येकी ४ आली असून त्याखालोखाल प्रत्येकी ३ मंत्री हे जळगाव, मुंबई, यवतमाळ, नागपूर, नाशिकला मिळाली आहे.(केपीएन)मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्याना महायुतीने संधी दिली आहे. या मंत्रिमंडळाला पुढील अडीच वर्षात उत्तम कामगिरी करून दाखवायची आहे. त्यानंतर त्यांच्या प्रगतीपुस्तकानुसार त्यांना कायम ठेवायचे कि डच्चू देऊन नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल, असा फॉर्म्युला महायुतीचा ठरलेला आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, दत्ता भरणे, भाजपचे चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, सातारा : शिवसेनेचे शंभूराजे देसाई, राष्ट्रवादीचे मकरंद पाटील, भाजपचे जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, जळगाव : भाजपचे गिरीश महाजन, संजय सावकारे, शिवसेनेचे गुलाबराव पाटील, मुंबई : भाजपचे गणेश नाईक, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, (केपीएन)यवतमाळ : भाजपचे अशोक उईके, सेनेचे संजय राठोड, राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक, नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सेनेचे आशिष जयस्वाल, नाशिक : सेनेचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे यांनी शपथ घेतली.
ठाणे येथून उपमुख्यमंत्री तथा दोन्ही सेनेचे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, कोल्हापूरचे सेनेचे प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, धुळे येथून भाजपचे जयकुमार रावल, बुलडाणा येथून भाजपचे आकाश फुंडकर, छत्रपती संभाजीनगर येथून सेनेचे संजय शिरसाट, भाजपचे अतुल सावे, बीड येथून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे व भाजपचे विधानपरिषदेचे पंकजा मुंडे हे भाऊ-बहीण, लातूर येथून राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील, सिंधुदुर्ग येथून भाजपचे नितेश राणे, रत्नागिरीचे दोन्ही सेनेचे योगेश सामंत, योगेश कदम,(केपीएन) नगर जिल्ह्यातून एकमेव भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, रायगड येथून सेनेचे भरत गोगावले, राष्ट्रवादीचे अदिती तटकरे, परभणीचे भाजप आ. मेघना बोर्डीकर, वर्धा येथून भाजपचे आ. डॉ. पंकज भोयर यांनी शपथ घेऊन जनतेची सेवा करू अशी ग्वाही दिली आहे.