जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटसह दुष्काळी सेस रद्द करा अशी मागणी आज जिल्हा भाजपने महाविकास आघाडी सरकारकडे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .
जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी हे निवेदन स्वीकारले . आमदार गिरीश महाजन , खासदार रक्षा खडसे , आमदार राजूमामा भोळे , जि प अध्यक्षा रंजना पाटील यांचा या शिष्टमंडळात समावेश होता .आमदार गिरीश महाजन , खासदार रक्षा खडसे , आमदार राजूमामा भोळे , जि प अध्यक्षा रंजना पाटील यांच्यासह जि प उपाध्यक्ष लालचंद पाटील , भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी , जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील , महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी , जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील , किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे , युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील , जिल्हा चिटणीस राजू सोनवणे , सुरेश धनके , हिरा चौधरी , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन , जिल्हा चिटणीस नवलसिंह राजपूत आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत.