पुढील महिन्यात होणार मतदान प्रक्रिया
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : – राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. यातील ६ जागा महाराष्ट्रातील आहेत. २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तसेच, त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी घोषणा केली. कार्यकाळ संपणाऱ्या खासदारात राज्यातील भाजपचे ३ खासदार असून विरोधी पक्षाचे प्रत्येकी १ असे तीन खासदार आहे.
१३ राज्यातील जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
*यांचा संपतोय कार्यकाळ*
* अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट)
* कुमार केतकर, काँग्रेस
* वंदना चव्हाण, राष्ट्रवादी (शरद पवार गट)
* प्रकाश जावडेकर, भाजप
* मुरलीधरन, भाजप
* नारायण राणे, भाजप