जळगाव ( प्रतिनिधी ) – लातुर येथे ३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पार पडली. यामध्ये जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार ने सुवर्णपदक प्राप्त केले. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती कु. निकिता दिलीप पवार हिने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करुन महिलांच्या ५७ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकाविले. या यशामुळे हैदराबाद येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात तिचे स्थान निश्चित झाले आहे. तिने पहिल्या फेरीत ठाणे, दुसऱ्या फेरीत कोल्हापूर तर अंतिम फेरीत पुणे ची खेळाडू श्रद्धा वाल्हेकर हिला नमवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. निकिता चे या वर्षांतील राज्य स्पर्धेतील लागोपाठ तिसरं सुवर्णपदक आहे, तर राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्णपदक एक कांस्यपदक तिने पटकाविले. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर, अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले आहे.
फोटो कॅप्शन – निकिता पवार सोबत प्रशिक्षक जयेश बाविस्कर









