चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे, राज्य महासचिव डॉ.विश्वासराव आरोटे,राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने रावेर येथील विनोद रामचंद्र कोळी यांची उत्तर महाराष्ट्र संघटक पदी निवड करण्यात आल्याचे पत्र उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी पाचोरा येथे दि.८ ऑक्टोंबर रोजी दिले. या निवडीबद्दल उत्तर महाराष्ट्र, खान्देश विभाग जळगांव जिल्हा व रावेर तालुक्यातील परिसरातील सर्व पत्रकार यांनी अभिनंदन केले आहे.
या आधी त्यांनी रावेर शहर अध्यक्ष नंतर जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व आता उत्तर महाराष्ट् संघटक पदाची धुरा समर्थपणे सांभाळण्याची जबाबदारी पूर्णपणे घेतली आहे .त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.