भाजपची पहिली यादी जाहीर, तिसऱ्यांदा विधानसभेवर संधी ; जिल्ह्यात विद्यमान आमदारांसह अमोल जावळे यांचे नाव
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांना तिसऱ्यांदा विधानसभा लढण्याची संधी भाजपकडून मिळाली असून भाजपच्या केंद्रीय समितीने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत आ. भोळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विद्यमान आमदारांचा समावेश या यादीत आहे. रावेर मतदार संघातून भाजपचे दिवंगत माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांना भाजपकडून संधी मिळाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ९९ नावं असून त्यात जळगाव जिल्ह्यातील ग्रामविकासमंत्री आ.गिरीश महाजन, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. संजय सावकारे व आमोल जावळे या पाच उमेदवारांचा समावेश आहे.
भाजपची पहिले यादी खालील प्रमाणे – नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस, कामठी -चंद्रशेखर बावनकुळे, शहादा – राजेश पाडवी, नंदूरबार- विजयकुमार गावीत, धुळे शहर -अनुप अग्रवाल, सिंदखेडा – जयकुमार रावल, शिरपूर – काशीराम पावरा, रावेर – अमोल जावळे, भुसावळ – संजय सावकारे,जळगाव शहर – सुरेश भोळे, चाळीसगाव – मंगेश चव्हाण, जामनेर -गिरीश महाजन,चिखली -श्वेता महाले, खामगाव – आकाश फुंडकर, जळगाव (जामोद) – संजय कुटे, अकोला पूर्व – रणधीर सावरकर, धामगाव रेल्वे – प्रताप अडसद, अचलपूर – प्रवीण तायडे, देवली – राजेश बकाने, हिंगणघाट – समीर कुणावार, वर्धा – पंकज भोयर, हिंगना – समीर मेघे, नागपूर दक्षिण – मोहन माते,नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे, तिरोरा – विजय रहांगडाले, गोंदिया – विनोद अग्रवाल, अमगांव – संजय पुरम, आर्मोली – कृष्णा गजबे, बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, चिमूर – बंटी भांगडिया वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार, रालेगाव – अशोक उडके, यवतमाळ – मदन येरवर, किनवट – भीमराव केरम, भोकर – क्षीजया चव्हाण, नायगाव – राजेश पवार, मुखेड – तुषार राठोड
जनतेची सेवा हा एकाच नारा – आ. सुरेश भोळे
भाजपकडून विधानसभा निवडणुकीची संधी मिळाल्यानंतर जनतेची सेवा हा एकच नारा घेऊन जळगाव शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केली. तिसऱ्यांदा संधी मिळाल्याबाबत पक्षश्रेष्ठींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानून त्यांच्या प्रयात्नातुन संधी मिळाल्याचे आ. भोळे म्हणाले.