उरलेले शेवटचे आमदारही गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाठिंब्यावर असलेले शेवटचे अपक्ष आमदारही आता शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे जिल्ह्यातील चार आमदार व पाठिंब्यावर असलेले अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील असे पाच जण शिंदे गटात सामील झाल्यामुळे आता शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांमध्ये देखील फूट पडणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एकनाथराव शिंदे यांच्या गटांमध्ये पूर्वीच चिमणराव पाटील किशोर पाटील आणि लता सोनवणे आमदार समाविष्ट झाले आहेत सकाळपासून गुलाबराव पाटील हेदेखील ठेवला आहे तिकडे गेल्याची माहिती आहे त्यात आता चंद्रकांत पाटील हेदेखील गुवाहाटी येथे गेल्याने खळबळ उडाली आहे.