जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्र्यांच्या एकतर्फी कार्यक्रमाला कंटाळून शिंदेंसह शिवसेना आमदारांनी हा निर्णय घेतलेला आहे, हा असंतोष आहे. त्याचाच हा परिणाम आहे असं वक्तव्य माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय.
मी महिनाभर झालं मुंबईतच आहे. आमच्या बैठकीचं काम महिनाभर चालू आहे. त्यामुळे आमच्या बैठकीचा या सगळ्याशी संबंध नाही, असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. मुख्यमंत्र्यांच्या एकतर्फी कार्यक्रमाला कंटाळून आमदारांनी हा निर्णय घेतलेला आहे, हा असंतोष झालेला आहे. त्याचाच हा परिणाम आहे असंही वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय. दरम्यान या सर्व घडामोडींमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.