उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत घोषणा
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव लोकसभेच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाचा सस्पेन्स अखेर संपला असून जळगावच्या जागेसाठी पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावाची बुधवार दि. ३ एप्रिल रोजी पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. त्यामुळे आता भाजपच्या स्मिता वाघ यांच्याविरुद्ध करण पवार यांच्यासोबत काट्याची टक्कर होणार आहे.
बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्यासह करण पवार यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आता उमेदवाराची घोषणा झाल्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागणार आहेत.