सावद्यातही दिली भेट
रावेर (प्रतिनिधी) : येथील रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी भुसावळ येथे लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती दिली. लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी मेळाव्याचे संयोजन केले होते.
मेळाव्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, सचिन धांडे, भगत पाटील, सुरेंद्र पाटील, जयश्री सोनवणे, कैलास मोरे, प्रमोद पाटील, प्रदीप सपकाळे, आकाश कुरकुरे, केशव वाघ, रुपसिंग बारेला, गेमा बारेला, मुस्तफा तडवी यांच्यासह भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर तालुक्यातील कार्यकर्ते तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच आणि महाविकास आघाडीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर उमेदवार श्रीराम पाटील यांनी सावदा शहर आणि परिसरातील महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसंदर्भात नियोजन केले. बैठकीला रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक धनंजय चौधरी, लोकसभा क्षेत्र प्रमुख मिलिंद पाटील, शरद भारंबे, गौरव भैरवा, एस.टी. कामगार संघटनेचे नितीन महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष एकलव्य कोल्हे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सय्यद अजगर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष शकील पठाण आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित होते.