रावेर (प्रतिनिधी) : येथील लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी तालुक्यात विविध ठिकाणी श्रीराम नवमीनिमित्त भेटी देऊन भगवान श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
रावेर तालुक्यातील सावदा येथे प्राचीन राम मंदिरात रामनवमीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी, मंदिराचे विश्वस्त मोहन नम्र, मोरेश्वर् तसेच मिलिंद पाटील, लाला चौधरी, गौरव भैरवा, एकलव्य कोल्हे यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
रावेर शहरात श्रीराम नवमीच्या भव्यदिव्य शोभायात्रेत उमेदवार श्रीराम पाटील हे सहभागी झाले. तिथे प्रभू श्रीरामचंद्र यांचे त्यांनी दर्शन घेतले. तरुण मित्र यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. तसेच शहरातील ऐतिहासिक मोठ्या राम मंदिरात प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे शुभाशीर्वाद घेतले. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने या वेळेला उपस्थिती दिली होती.
मुक्ताईनगर येथील प्रभू श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रेमध्ये उमेदवार श्रीराम पाटील सहभागी झाले. त्यांनी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेतले. प्रसंगी श्रीक्षेत्र मुक्ताबाई संस्थांचे रवींद्र हरणे महाराज, उद्धव महाराज, पुरुषोत्तम वंजारी, बापू गावंडे, प्रमोद सोनवणे, विशाल साबळे, किरण महाजन यासह असंख्य रामभक्त उपस्थित होते.