सुशिक्षित उमेदवार मिळाल्याने अमळनेरकर आनंदी
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा मोठी चुरस बघायला मिळत असून, ‘शहर विकास आघाडी’ विरुद्ध ‘शिवसेना (शिंदे गट)’ यांच्यात सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे, ज्यामुळे सन्मानपूर्वक जागा न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. याचा फटका शहर विकास आघाडीला बसू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर, तिकीट नाकारल्याने ऐनवेळी शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झालेले आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून उभे राहिलेले डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या उमेदवारीने शिंदे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यालयात शिवसेनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी अमळनेर नगरपालिकेला कर्जमुक्त करून शहराला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले, माजी आ.शिरीष चौधरी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “काही लोकांना ‘कानाखालचा’ किंवा ‘रबरी शिक्का’ असा उमेदवार हवा होता, मात्र आम्ही एक उच्चशिक्षित आणि निष्कलंक उमेदवार उभा केला आहे. डॉ. परीक्षित बाविस्कर हे व्यवसायाने डॉक्टर असून, त्यांनी आजवर लोकहिताचीच कामे केली आहेत. त्यामुळे मतदार त्यांनाच विजयी करतील, याची आम्हाला खात्री आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी महत्त्वाकांक्षी घोषणा केली. ते म्हणाले, “डॉक्टर असल्याने मृत अवस्थेत असलेल्या नगर पालिकेला सलाईन लावून संजीवनी देणार.” यावेळी त्यांनी अमळनेर नगरपालिकेच्या करोडो रुपयांच्या कर्जाच्या ओझ्यावर बोट ठेवत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने नगरपालिका कर्जमुक्त करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्ट केले. डॉ. बाविस्कर यांनी पुढील समस्या प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील, माजी नगरसेवक बबलू पाठक, पंकज चौधरी, तसेच शिवसेनेचे अन्य इच्छुक उमेदवार









