नामांकन रॅलीमध्ये जनतेकडून मिळाला प्रतिसाद
एरंडोल (प्रतीनिधी) : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी आज अखेरच्या दिवशी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सर्वप्रथम या अर्ज दाखल करण्याची सुरूवात भव्य महा रॅलीने करण्यात आली. सकाळी १० वाजेपासुन शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा – क्रांतिज्योती महात्मा फुले यांचा पुतळा – अमळनेर दरवाजा – श्री विठ्ठल मंदीर – पांडव वाडा – भोई गल्ली – जे.डी.सी.सी.बँक – भगवा चौक – राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा – श्री मरिमाता मंदीर – आर.टी.काबरे विद्यालय – धरणगांव चौफुली – बसस्थानक – वैष्णवी हॉटेल व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समाप्ती झाली. तद्नंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जळगांव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ, आ. मंगेश चव्हाण, आ. चिमणराव पाटील, भाजपा संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महायुतीची जाहीर सभा पार पडली.
यावेळी अनेक बांधवांनी आ. चिमणराव पाटील व अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. प्रसंग शिवसेना -भाजपा- राष्ट्रवादी-रिपाई यांसह अंगिकृत पक्षांचे व संघटनेचे जिल्हाप्रमुख, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, उपजिल्हाध्यक्ष, महायुतीचे समन्वयक, विधानसभा क्षेत्रप्रमुख, विधानसभा प्रमुख, तालुकाप्रमुख, तालुकाध्यक्ष, उपतालुकाप्रमुख, उपतालुकाध्यक्ष, शहरप्रमुख, शहराध्यक्ष, उपशहरप्रमुख, उपशहराध्यक्ष, शहरसंघटक, तालुकासंघटक, जिल्हापरिषद, जिल्हा बँक, जिल्हा दुध संघ, पंचायत समिती, नगरपरिषद, बाजार समिती, शेतकी संघ, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, शिक्षण संस्था यांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य,शिवसेना, भाजपा-राष्ट्रवादी-रिपाई यांसह अंगिकृत पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.