उद्या होणार पालकमंत्र्यांच्या उपस्थित बैठ ; जळगाव प.स.सभापतीचे नाव होणार निच्छित
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव पंचायत समितीचे सभापती नंदलाल शांताराम पाटील यांनी नेत्यांच्या आदेशावरून आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिला असून.उद्या पालकमंत्र्यांच्या उपस्थित पंचायत समितीचे सदस्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील प.स.सभापतीचे नाव निच्छित होणार आहे.
जळगाव पंचायत समिती सभपती नंदलाल शांताराम पाटील यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे दि.२२ रोजी दुपारी ३.३० वाजता आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा ना.सौ. रंजना पाटील या नाशिकला असल्यामुळे त्यांनी आपला राजीनामा जि.प.सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे दिला असून राजीनामा देतांना त्यांच्यासोबत इदगावचे जनार्दन पाटील, रिधुरचे माजी सरपंच दिलीप जगताप, कुसूंबा येथील आकाश पाटील उपस्थित होते.
17 महिन्याच्या कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी नेत्यांच्या आदेशाने राजीनामा दिला आहे. शुक्रवार दि.२५ रोजी पालकमंत्री नाग़ुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सर्व पंचायत समिती सदस्यांची बैठक होणार असून या बैठकीत सभापती पदासाठी उमेदवार निश्चित केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.