जळगाव ( प्रतिनिधी ) – वैध मापन शास्त्र विभागातील शिपाई राजेंद्र सोनार यांचा कोरोनाकाळात कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसांना राज्य सरकारच्या धोरणानुसार ५० लाखांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे .
सहनियंत्रक, वैध मापन शास्त्र यांनी १ मार्च, २०२१ च्या आदेशान्वये गॅस सिलेडरची तपासणी मोहिम राबविण्याबाबत आदेश दिले होते. तपासणी मोहिमे दरम्यान राजेंद्र सोनार हे निरीक्षक, वैध मापन शास्त्र, चाळीसगांव विभाग यांना सहाय्य करण्याकरीता कर्तव्यावर हजर होते. राजेंद्र नथ्थू सोनार हे कर्तव्यावर
असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने सिध्दिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, नाशिक या रुग्णालयात त्यांचे १९ एप्रिल , .२०२१ रोजी निधन झाले होते .
राजेंद्र सोनार मृत्युच्या १४ दिवसांपूर्वी कर्तव्यावर हजर होते. हे नियंत्रक, वैध मापन शास्त्र यांनी प्रमाणित केलेली आहे. सिध्दिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, नाशिक यांनी राजेंद्र सोनार यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यु झाल्याचे प्रमाणित केले आहे.
शासन निर्णयानुसार दिवंगत राजेंद्र सोनार यांच्या वारसास म्हणजे त्यांच्या पत्नी श्रीमती सुरेखा राजेंद्र वानखेडे ( रामनारायण नगर, पाचोरा ) यांना पन्नास लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे , असे त्यांना कळवण्यात आले आहे .