पुणे (वृत्तसंस्था) – जगातील प्रसिद्ध उद्योजक, देशातील प्रसिद्ध कंपनी असलेल्या बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे देशाची खूप मोठी हानी झाली आहे. गेल्या पाच दशकापासून बजाज समूहाला यशाच्या सर्वोच्च शिखरात पोहोचवण्यात त्यांचा खूप मोठा आणि मौल्यवान वाटा राहिला आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगसमूहात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
ते तरुण उद्योजकांसाठी एक प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या निधनामुळे बजाज समूहाचं वैयक्तिक खूप मोठं नुकसाण झालं आहे. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. राहुल बजाज यांना 2001 मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.