जळगाव ( प्रतिनिधी ) – राग, द्वेष असेल तर समभाव येणे केवळ अशक्य! राग, द्वेषामुळे कर्मबंध उत्पन्न होतात. या दोहोंमुळे क्रोध, अहंकार या कषायांची उत्पत्ती होते. राग आणि द्वेष हे तर कर्मबंधाचे बीजे म्हणावे लागेल किंवा त्याला जंगलात पेटलेला वणवा, आरडीएक्सच समजा. या दोहोंचा त्याग केल्याशिवाय समभाव निर्माण होणे केवळ अशक्य असते. असे मौलीक विचार व्यक्त केले शासन दीपक परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवनातून व्यक्त केले.
राग, द्वेष याने युक्त असाल तर चतुर्गती अटळ आहे. अशी चतुर्गती टाळण्यासाठी तप साधनेतून आपले पुण्य वाढवावे. आसक्ती (राग) आणि द्वेषापासून मुक्त होण्यासाठी, मनुष्याने मोक्षमार्गाचा आचरण केला पाहिजे. त्याविषयी त्यांनी चंदनबाला, धारणी आणि सारथी यांची गोष्ट सांगितली. दैनंदिन जीवनातील उदाहरण रिले शर्यतीत जसा एक खेळाडून विशिष्ट अंतरानंतर आपल्या पुढील खेळाडूला ते बॅटन देतो व दुसरा खेळाडू ते घेऊन धावतो त्याच प्रमाणे आपल्या पूर्वजांनी विवाहरुपी बॅटन आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. राग म्हणजे आसक्ती पती-पत्नी यांच्यामध्ये ती निर्माण झाली तर काय होते याबाबतचे स्पष्टीकरण एका गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी प्रस्तुत केले. उत्तराध्यायन सुत्रातील ३२ व्या अध्यायातील एका चरणाचा संदर्भ घेत उपस्थित श्रावक-श्राविकांना राग व द्वेष कर्मबंधाचे बीज कसे ठरते आणि त्याचे कर्माच्या वृक्षात कसे रुपांतर तर होतेच परंतु त्यामुळे जन्म मरणाचा फेऱ्यात जीव अडकतो हे समजावून सांगितले. या प्रवचना आधी परमपुज्य भुतीप्रज्ञ महाराज साहेब यांचे प्रवचन झाले. त्यांच्या प्रवचनात सहा स्वप्नांचे विवेचन सुरू आहे.