जळगांव :- जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीचा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याला तायक्वांडो या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन २०२४-२५ चा गुणवंत खेळाडू पुरस्काराने आज जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक उपस्थित होते. पुष्पकला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, महासचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य सौरभ चौबे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे, जयेश बाविस्कर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.