भडगाव तालुक्यातील कजगाव येथील घटना
भडगांव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कजगांव येथील शितल हॉटेल मध्ये मागील भांडणाच्या कारणावरून एका ३० वर्षीय तरुणांला तिंघानी मारहाण करीत पोटावर चाकुने वार करीत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत कजगांव येथील तीन सशंयित आरोपीविरोधात भडगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कजगांव येथील रहिवाशी चेतन निवृत्ती पवार या ३० वर्षीय तरुणाला मागील भांडणाच्या कारणावरून दि.३० रोजीच्या रात्री ११ वाजता हॉटेल शितल येथे तीन तरुणांनी बोलाविले. त्यांच्या हातातील लाकडी दांडक्यासह चेतन यास मारहाण करीत त्यांच्या हातातील चाकु सारख्या धारदार हत्याराने त्याच्या पोटावर वार करून गंभीर दुखापत केली.
तसेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन जखमी तरुणाचा चुलत भाऊ समाधन ज्ञानेश्वर पवार यांच्या फिर्यादीवरुन भडगांव पो.स्टे. ला संशयित आरोपी दिपक लालसिंग पाटील,जय दिपक पाटील,पियुष दिपक पाटील सर्व रा. कजगाव ता. भडगांव यांच्या विरोधात भडगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे.