भडगाव ( प्रतिनिधी ) – येथील नेहा मालपुरे यांना नॅशनल अकॅडमी फॉर आर्ट एज्युकेशनच्या इंडिया स्टार आयकाॅनिक पर्सनालिटी अचिव्हर्स २०२१ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना सुलेखन ( सर्जनशील लिखाण ) विभागात हा पुरस्कार ऑनलाइन पद्धतीने देण्यात आला.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पदक असे या पुरासकाराचे स्वरुप असून, नेहाला महाराष्ट्र हिंदी साहित्य अकाडमीचे चेअरमन डॉ दामोदर खडसे, आकाशवाणी कलाकार घनश्याम वासवानी, विको प्रयोगशाळा मुंबईचे संचालक संजीव पेंढारकर, थर्ड जनरेशन मोबाइल प्राइवेट लिमिटेडच्या जॉईंट मैनेजिंग डायरेक्टर सुजाता देव, केंद्रीय शिक्षण मंत्रालयच्या सहाय्यक संचालक अंजू सिंघ, सुरभी संस्थेच्या अश्विनी आमले आदीच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
संपुर्ण भारतामधून विविध कला क्षेत्रातील १४ कलाकारांना हा अवार्ड देण्यात आला, त्यात नेहा मालपूरे यांचा समावेश आहे. नेहा विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेत सहभागी होत असतात. यापूर्वी देखील नेहाच्या चित्राची व गणाक्षर या कलेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बूक ऑफ रेकॉर्डसह विविध रेकॉर्डने घेतली आहे. त्या भडगाव येथील मानवराज प्रतिष्ठानचे संस्थापक नीलेश मालपूरे व चित्रा मालपुरे यांची कन्या आहेत.