गोदावरी अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून यशस्वी प्रयत्न
जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाउंडेशन संचलित, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील अंतिम वर्ष यांत्रिक अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी “पूर्णपणे स्वयंचलित ऑर्डिनो संचालित सोलर पॅनल क्लिनर रोबो” हे नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे यशस्वी डिझाईन व निर्मिती केली आहे.
हा प्रकल्प प्रा. मयूर पी. ठाकूर आणि प्रा. किशोर एम. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला.तुषार पाटील, वैभव पाटील, यद्नेश ठाकरे आणि निरज नारखेडे या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. सोलर पॅनलवर धूळ व मळ साचल्यामुळे निर्माण होणारी कार्यक्षमतेत घट होते. त्यांनी तयार केलेला हा रोबो ऑर्डिनो प्रोग्रामिंगच्या सहाय्याने पूर्णपणे स्वयंचलित आहे, जो कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय सोलर पॅनल स्वच्छ करतो, आणि त्यामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पॅनेलवर पडून ऊर्जा निर्मिती वाढते.या रोबोटमध्ये सेन्सर्स आणि मोटर यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे तो मोठ्या क्षमतेच्या व रिमोट सोलर प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरतो.