रावेर तालुक्याचा गौरव
रावेर (प्रतिनिधी) : पुरी गोलवाडे येथिल ग्रामसेवक आर .पी . तायडे यांना महाराष्ट् सरकारने महत्वाचा समजला जाणारा आयडॉल पुरस्कार मान्यवराच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. ग्रामीण भागात तायडे यांनी शासन नियमाच्या आधिन राहुन आपल्या सेवेच्या काळात अनेक ठिकाणी त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करून आपला ठसा उमटविला आहे . म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे.
मला सेवेच्या माध्यमातून मिळालेल्या सहकार्यामुळे व प्रत्येक गावातून सरपंच, उपसरपंच, सदस्यांचे सहकार्य मिळाल्याने मी इथ पर्यंत येऊ शकलो आहे. या आधी २००९ वर्षामध्ये सांगवी ता. यावल येथे सेवा बजावित असतांना त्यांनी संकल्प केला होता की संपूर्ण गाव हगणदारी मुक्त होणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. तो संकल्प गांवकऱ्यांच्या सहकार्याने पुर्ण करण्यास यश आले होते. तत्कालिन बिडोओ यांनी त्यांच्या पायात चप्पल घालून त्यांचा सत्कार केला होता. त्यांच्या या कार्याची दखल थेट जळगाव जिल्हा परिषदेचे सी .ओ .नी घेऊन, त्यावेळस महामहीम तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आर . पी . तायडे यांना सन्मानित करण्यात आले होते.
त्यामुळेच त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. पुरी गोलवाडे, स्वप्निल इंगळे, उपसरपंच, संतोष पाटील, सदस्य राहुल कोळी, संदीप पाटील, बापु कोळी व सर्व सदस्यांसह बलवाडी येथील सरपंच जितेंद्र महाजन बलवाडी, पुरी येथील ज्येष्ठ नागरिक व शेतिनिष्ठ शेतकरी गुलाबराव पाटील, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कोळी, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर तायडे, रतिराम कोळी, समाधान भालेराव, इत्यादिंचा समावेश आहे.