कजगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील कजगाव येथे तितुर नदीला आलेल्या महापुरात अनेकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. झालेले नुकसान पाहून कजगाव येथील तीनही रेशन दुकानदारांनी नुकसानग्रस्त नागरिकांना प्रत्येकी दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ माणुसकीच्या नात्याने वाटप केले.


यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील, रेशन दुकानदार भीमराव महाजन, दादाभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, निलेश पाटील, रतन महाजन, गौरव पाटील, संदेश पाटील आदी उपस्थित होते.







