पुणे ( वृत्तसंस्था ) – भोसरी एमआयडीसी येथे गणेश विसर्जनादरम्यान दोघे जण बुडाले आहेत. एकाचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्याचा अग्निशमन दल आणि आळंदी पोलिसांकडून शोध सुरू आहे. एमआयडीसी भोसरी आणि आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले.
हवालदार वस्ती आळंदी रोड येथील उत्तरेकडे असलेल्या इंद्रायणी नदीमध्ये माऊली वस्ती , डुडळगाव येथील ठोंंबरे कुटुंबातील नागरिक सायंकाळी गणेश विसर्जन करीता आले असताना शिवाजी ठोंबरे (वय ३०), नितीन ठोंंबरे (वय.३९), दत्ता ठोंंबरे (वय.२०) आणि प्रज्वल काळे (वय.१८) हे पाण्यात मुर्ती विसर्जनसाठी मध्यभागी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दता ठोंबरे व प्रज्वल काळे पाण्यात बुडाले.
या बुडालेल्या दोघांना पोहता येत नव्हते.ते मुर्ती विसर्जन केल्यानंतर आत पाण्यात गेले होते. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध घेतला असता प्रज्वल काळे यांचा मृतदेह पाण्यात मिळून आला असून दता ठोबरे यांचा शोध चालू आहे.