पल्लवी सावकारे यांचे जि.प.च्या सीईओ यांना निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गौण खनिज वाहतूक परवान्यांची माहिती मिळावी आणि चौकशी करावी. या मागणीचे निवेदन जि.प. सदस्य पल्लवी सावकारे यांनी शुक्रवारी २५ रोजी जि.प.च्या सीईओ यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तीन ते चार महिन्यांपासून लेखी पत्र देऊनही जि.प.चे जलसंधारण अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच या विभागातून काहीशा मिळालेल्या माहितीमध्ये पाझर तलावांची माहिती देण्यास टाळले आहे. सदर गैर प्रकार हा भडगाव, पाचोरा, जळगाव, चाळीसगाव अश्या तालुक्यांमध्ये जास्त झाला आहे.
सदर गैरप्रकाराची चौकशी होऊन वरील तालुक्यातील साठवण बंधारा बांधणे, पाझर तलाव दुरुस्ती तसेच इतर कामाची रॉयल्टी बाबतची सविस्तर माहिती मिळावी. यामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार जर सहभागी दिसत असतील तर, शासनाच्या बुडविण्यात आलेल्या गौण खनिजाची रक्कम दंडासह संबंधितांकडून वसूल करावी असेही निवेदनात पल्लवी सावकारे यांनी म्हटले आहे.







