जळगाव शहरातील उस्मानिया पार्क येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – घराच्या हॉलमध्ये चार्जिंगला लावलेले दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. ही घटना दि. २४ रोजी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास उस्मानिया पार्कजवळील मलिक हायस्कूल जवळ घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील उस्मानिया पार्कमधील मलिक हायसकुलजवळ शेख गफूर शेख कादर हे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक वास्तव्यास आहे. दि. २४ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांनी घराच्या हॉलमध्ये मोबाईल चार्जिंगला लावलेले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचा लोटलेला दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चार्जिंगला लावलेले २० हजार रुपये किंमतीचे दोन्ही मोबाईल चोरुन नेले. ही घटना पावणेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर शेख गफूर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सतिष पाटील हे करीत आहे.









