जळगाव शहरात सम्राट कॉलनी येथील घटना
प्रकाश सेनू गव्हाळे (५०, रा. सम्राट कॉलनी) असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. ते मजुरी, रंगकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. प्रकाश गव्हाळे हे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना यांच्यासह सम्राट कॉलनीत राहत होते. रविवारी ते घरी एकटेच असताना त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. या घटनेमुळे सम्राट कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.