डॉ. प्रेमचंद पंडीत लिखीत पुस्तकाचे डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत लिखित प्रेमवाणी या पुस्तकाचे भव्य प्रकाशन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान प्रेमवाणी हे पुस्तक समाजाला सकारात्मक उर्जा प्रदान करणारे ठरेल असा विश्वास डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केला.
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद वाणी लिखीत हे पुस्तक आयुष्याला सकारात्मक प्रगतीची दिशा देणारे असून कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सकारात्मक उर्जेवर भर देणारे आहे. डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी पहाटे मोबाईल गृपवर नियमितपणे पाठवलेल्या प्रेरणादायी संदेशांचे संकलन करून हे पुस्तक तयार केले आहे. या संदेशांनी अनेक लोकांना जीवनात प्रेरणा दिली असून, हे विचार पुस्तकाच्या रूपात आणल्यामुळे अधिकाधिक वाचकांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. तसेच डॉ. उल्हास पाटील यांनी प्रेमवाणी हे पुस्तक जीवनात सकारात्मकता आणि आशावाद निर्माण करणारे असल्याचे सांगितले. कठोर परिश्रम आणि सततच्या आत्मपरीक्षणातून यशाचे शिखर गाठता येते, हा संदेश या पुस्तकातून मिळतो. प्रेमवाणी हे केवळ एक पुस्तक नसून, जीवन जगण्याची सकारात्मक दिशा देणारे मार्गदर्शक असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस.आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, हृदयविकार तज्ञ डॉ. वैभव पाटील, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, मानसोपचार तज्ञ डॉ. विलास चव्हाण, डॉ. सौरभ भूतांगे, डॉ. आदित्य जैन, डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. हुमेद महाडीक, डॉ. किरण जोगवाडेयांच्यासह मान्यवर उपस्थित होते.