• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रेम संबंध ठेव अन्यथा पती, मुलांना मारून टाकीन : विवाहितेच्या आत्महत्येचे कारण उघड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
विवाहितेची छताला गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील घटनेप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील किनगाव येथील एका विवाहितेने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता एका तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. माझ्याशी प्रेम संबंध ठेव अन्यथा तुझ्या पतीला, मुलांना मारून टाकीन असा जीवघेणा मानसिक छळ केल्यामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याचे पतीच्या फिर्यादीमधून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किनगाव बुद्रुक ता. यावल येथील रहिवासी नीलिमा संजय कोळी (वय २८) ही विवाहिता शनिवारी आपल्या घरी होती. मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. (केसीएन)दरम्यान, तिने आपल्या घरातील स्वयंपाक घरात दोर बांधून गळफास घेतला. हा प्रकार तिचे पती संजय भागवत कोळी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी धाव घेतली आणि विळ्याने दोर कापला. दोर कापल्यानंतर महिला जमिनीवर कोसळली आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली. तेव्हा तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले.

याप्रकरणी नीलिमा कोळी यांचे पती संजय भागवत कोळी यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. संजय कोळी यांच्या घराजवळ संशयित रुपेश राजेंद्र धनगर याचा गुरांचा गोठा आहे. (केसीएन)त्यामुळे संजय कोळी यांच्या घराजवळ रुपेश धनगर याचा वावर होता. त्यावेळेला रुपेश हा संजय याची पत्नी नीलिमा कोळी हिच्याकडे तो वाईट नजरेने नेहमी बघत होता. याबाबत संजय कोळी यांनी रुपेश धनगर याला जाब विचारला होता. त्यावेळेला त्यांच्यात हमरातुमरी देखील झाली होती. ती ग्रामस्थांनी सोडवली होती.

दरम्यान याच गोष्टीवरून नीलिमा कोळी या घाबरलेल्या होत्या. दि. २७ सप्टेंबर रोजी जेव्हा संजय कोळी कामावरून घरी आले तेव्हा नीलिमा कोळी या घाबरलेल्या दिसल्या. संजय कोळी यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. (केसीएन)तेव्हा रुपेश धनगर हा माझ्याकडे घरासमोर चकरा मारून वाईट नजरेने पाहत होता असे तिने सांगितले. त्यावेळेला नीलिमा हिला कुटुंबीयांनी धीर दिला. मात्र मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास काहीतरी पडल्याचा आवाज झाल्यामुळे कुटुंबीय जागे झाले किचनमध्ये जाऊन पाहिले तर नीलिमा कोळी हिने गळफास घेतला होता.

त्यावेळेला पती संजय कोळी यांनी गळफासाचा दोर तोडून नीलिमा हिला गावातील एका खाजगी वाहनाने यावल रुग्णालयात दाखल केले. तिथे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावरून रुपेश धनगर याने नीलिमा कोळी हिला तू माझ्याशी प्रेम संबंध ठेव अन्यथा तुझ्या पतीला व मुलांना ठार मारून टाकीन अशी धमकी देऊन तिच्याकडे वारंवार वाईट नजरेने पाहून मानसिक छळ केल्यामुळे तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रुपेश धनगर यांच्याविरुद्ध संजय कोळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra police
Previous Post

शेतकरी आत्महत्या समिती बैठकीत १० प्रस्तावांना मान्यता, ५ प्रस्ताव फेटाळले

Next Post

पावसामुळे अमळनेर तालुक्यातील ९ हजार ६२५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पावसामुळे अमळनेर तालुक्यातील ९ हजार ६२५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

पावसामुळे अमळनेर तालुक्यातील ९ हजार ६२५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात
1xbet russia

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

July 24, 2026
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी
1xbet russia

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी

July 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon