जळगाव गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – धुळ्याला जातो आहोत असे सांगत प्रवासी वृद्धाला रिक्षेत बसवल्यावर पुढे त्यांच्याकडचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर त्याला उतरवून देत फरार झालेली ४ चोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे . या चोरांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
बुधवारी फिर्यादी शेख जलील शेख ईब्राहीम ( वय ७२ रा. तांबापुरा ) हे धुळे जाण्यासाठी आकाशवाणी चौकात थांबलेले असता एका ऑटो रिक्षाचालकाने त्यांना कोठे जाता आहे अशी चौकशी केली . नंतर त्याने आम्हीसुध्दा धुळे येथे जात आहोत असे सांगुन फिर्यादीस रिक्षात बसवुन घेतले . धुळे रोडने पुढे गेल्यावर रिक्षात पूर्वीपासुन बसलेले तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील १५,०००/- रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र हिस्कावुन घेत फिर्यादीस उतरुन दिले आणि ते रिक्षासह पळून गेले होते. रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुरन २९/२०२२ भादवी कलम ३९२, ३४ प्रमाणे ४ अज्ञात चोरटया विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला .
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अकरम शेख, सुधाकर अंभोरे, पोना प्रितम पाटील, राहुल पाटील, नितीन बाविस्कर, अविनश देवरे, चालक पोहेकॉ भारत पाटील यांच्या पथकाने या आरोपीचा शोध घेवून मोसिन खान उर्फ शेमडया नुरखान पठाण ( २८ रा. पिंप्राळा हुडको ) , शाहरुख शेख रफीक ( २० रा. पिंप्राळा हुडको) , समाधान सुमेरसिंग पाटील ( ३३ रा. खंडेराव नगर) यांना अटक केली त्यांनी गुन्हयाचे कबुली देउन साथीदार सद्दाम उर्फ पिके पिंजारी ( रा. खंडेराव नगर ) याच्यासह गुन्हा केल्याची माहीती दिली त्यांनी गुन्हयात वापरलेले ऑटो रिक्षा आरोपी समाधान पाटील याच्याकडुन हस्तगत करण्यात आली.
या आरोपींना रामानंदनगर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे. मोसिन खान उर्फ शेमडय़ा पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन तो प्रवासी लोकांना रिक्षात बसवुन त्यांची जबरीने लुटमार करतो त्याचे विरुध्द जळगांव शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये आधीही गुन्हे दाखल आहेत.