जळगाव ( प्रतिनिधी ) बाभुळगाव तालुका धरणगाव येथे मूलभूत सुविधा अंतर्गत पेव्हर ब्लॉकच्या कामाचे (अंदाजे रक्कम 6 लक्ष) भूमिपूजन 12 ऑगस्ट रोजीजिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
गावाला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, शेतकी संघ अध्यक्ष नवल अप्पा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन नाना पाटील, उपसरपंच राजेंद्र मुरलीधर पाटील, सुरेश भालेराव, ज्ञानेश्वर पाटील, राजू हरी पाटील, शाखाप्रमुख कैलास कोळी, सुकदेव अहिरे, तुकाराम पाटील, काशिनाथ आबा, साहेबराव कोळी, मोहन कोळी, राहुल पाटील, पवन पाटील, भूषण पाटील, नितीन बोरगावकर, अशोक अप्पा, सर्व शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.