जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील प्राजक्ता बुंधे ( बारी ) चा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर प्राजक्ताच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या ५ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राजक्ता बारीचा पती , सासरा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले . त्यांना मोहाडीच्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून उर्वरित सासु , जेठ व ननंद ( सर्व रा. शिरसोली प्र न ) आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
या आरोपींना आज जिल्हा व सत्र न्यायाधीश शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते .