जामनेर ;- तालुक्यातील व शहरातील अनाथ बांधवांना प्रहार जनशक्ती पक्ष जामनेर यांच्याकडुन आवाहन करण्यात करण्यात आले असून अनाथ बांधवांना अनाथ सर्टिफिकेट अपंग सर्टिफिकेट जातीचे दाखले नॅशनललिटी डोमोसाईल सर्टिफिकेट काढून देणार असुन विविध योजना शासकीय पातळीवरून मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार आहेत .
आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे हिवरखेडा तवा येथे भेट दिली असुन अनेकांना मार्गदर्शन करण्यात आले. लवकरच मदत मिळवुन देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष मयुर पाटील तालुका संपर्क प्रमुख भुषण कानडजे ,उपाध्यक्ष विशाल हिवाळे, सचिव दिपक उंबरकर ,सरचिटणीस राहुल रॉय मुळे ,सोशल मीडिया प्रमुख राधेश्याम कोळी, सामाजिक कार्यकर्ते दशरथ पाटील, राहुल पाटील, मंगलसिंग पाटील, नागेश्वर पाटील, दिनेश पाटील, हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यातील सर्व अनाथ बांधवांनी खालील नंबरवर संपर्क साधावा
भुषण कानडजे
7083111237
राहुल रॉय मुळे
9860909230
दिपक उंबरकर
9359993493
विनोद पाटील
9175308258
मयुर पाटील
7798472599







