प्रभाग १३ ‘ड’ मध्ये प्रफुल्ल देवकर यांचा करिष्मा, विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा ‘कौल’ निश्चित !
जळगाव (प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत प्रभाग १३ ‘ड’ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल देवकर यांनी मोठी मुसंडी मारली आहे. त्यांच्या प्रचाराचा वाढता आलेख पाहता, राजकीय विश्लेषकांकडून “विजयाची केवळ औपचारिकता बाकी” असल्याचे बोलले जात आहे.


“शब्दापेक्षा कृती मोठी” या उक्तीप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून जनतेच्या सुख-दु:खात धावून जाणारे नेतृत्व म्हणून प्रफुल्ल देवकर यांनी प्रभाग १३ ‘ड’ मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेल्या देवकर यांच्या प्रचाराला जनसामान्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे.

प्रफुल्ल देवकर यांच्या जमेच्या बाजू:
जनसंपर्क : प्रभागातील प्रत्येक गल्ली आणि घराघरात असलेला थेट संपर्क ही त्यांची सर्वात मोठी शक्ती ठरत आहे.
तरुण आणि अभ्यासू नेतृत्व : प्रभागातील पायाभूत सुविधांपासून ते युवकांच्या रोजगारापर्यंतच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण आहे.
महायुतीची ताकद : अजित पवार गटाच्या घड्याळासोबतच महायुतीमधील घटक पक्षांची एकजूट त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करत आहे.
विजयाचा ‘रोडमॅप’
प्रफुल्ल देवकर यांनी आपल्या प्रचारात केवळ टीका न करता ‘व्हिजन १३ ड’ मांडले आहे. यामध्ये १. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हाय-टेक उपाययोजना. २. प्रभागातील ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे. ३. डिजिटल लायब्ररी आणि गार्डनचे सुशोभीकरण. ४. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रांची निर्मिती असे आहे.
वातावरण काय सांगते ?
प्रभागातील कोपरा-सभा आणि पदयात्रांमध्ये उसळणारी गर्दी हे दर्शवते की, मतदारांनी प्रफुल्ल देवकर यांच्या रूपाने आपला हक्काचा नगरसेवक मनातून निवडून दिला आहे. प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत प्रचारात आघाडी आणि कामाचा दांडगा अनुभव यामुळे आता केवळ मतदानाची आणि निकालाची औपचारिकता शिल्लक असल्याचे चित्र दिसत आहे.










