जळगाव ( प्रतिनिधी )- जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप पवार यांचा २८ ऑक्टोबररोजी पदग्रहण सोहळा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अध्यक्ष खासदार सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ७ ऑक्टोबररोजी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रदीप पवार यांची नियुक्ती केलीय . नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा पदग्रहण समारंभ २८ ऑक्टोबररोजी दुपारी काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.