रावेर तालुक्यातील खिर्डीचे रहिवासी
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था मुंबई,मत्स्योदरी महाविद्यालय, अंबड सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी महाविद्यालय, अंबड द्वारा आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र अंबड जि. जालना येथील मत्स्योदरी महाविद्यालय, अंबड येथे “महानुभव साहित्य व संत साहित्यातील मूल्यविचार” या राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्ष डॉ. शहाजी गायकवाड प्राचार्य, मत्स्योदरी महाविद्यालय, अंबड तर उद्घाटक डॉ. सुभाष बागल, मराठी विभाग प्रमुख, चिश्तिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खुलताबाद, भारतभूषण शास्त्री जामोदेकर व प्रमुख उपस्थिती माजी प्राचार्य राजधरबाबा शास्त्री मराठे, श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय, फैजपूर होते. त्यामध्ये श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाकडून विद्यार्थी प्रदीप नरेन्द्र पंजाबी यांनी महानुभावाची ग्रंथसंपदा शोध निबंध वाचन केले. यात त्याना उल्लखेनीय प्राविण्य मिळाले. सर्व स्तरावरुन त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. चक्रधर कोठी तर आभार डॉ. सुषमा प्रधान यांनी केले.