जळगाव (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ज्या मुलांनी वय ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या शिक्षण कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत.
सदरचे अर्ज संकेतस्थळ मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी / जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्थ, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात. राज्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. असे आयुक्त महिला व बाल विकास यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.