जिल्हा परिषदेच्या सीईओंनी केले मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) :- प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत टप्पा २ मधे दि. २७ मार्च रोजी एकाच दिवशी जिल्हाभरात ३४ हजार ४२३ घरकुलांचे भूमीपूजन करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत टप्पा २ सन २०२४-२५ या वर्षात जळगाव जिल्ह्याला ८६ हजार ६८९ इतके घरकुल मंजूर करण्यात आलेले होते.यापैकी प्रथम हप्ता ७१ हजार ६४५ लोकांना वितरित करण्यात आलेला होता.
यामध्ये जळगाव जिल्ह्यात दि. ४ मार्च रोजी एकाच वेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मध्ये घरकुल सुरू करण्याकरिता मोहीम राबवण्यात आलेली होती. या मोहिमेंतर्गत ३५ हजार २६४ इतकी घरकुल सुरू करण्यात आलेले होते. तसेच आज दि. २७ रोजी मोहीम स्वरूपात ३५ हजार ४३५ इतके घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. असे एकूण ७ लाख ७ हजार ६८७ घरकुल सुरू करण्यात आले आहे. या कामी सर्व गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता इतर सर्वांनी सहभाग नोंदवून लाभार्थ्यांकडून घरकुल सुरू करून घेतली. तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव यांनी प्रत्यक्ष तालुकास्तरीय भेटी घेऊन जास्तीत जास्त घरकुले सुरू करण्यात आली. दिलेल्या कार्यक्षेत्रात सातत्याने पाठपुरावा करून घरकुल पूर्ण करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ऑनलाईनद्वारे सर्व गटविकास अधिकारी यांना मार्गदर्शन केले.