• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

पित्याने दिली फिर्याद, कुटुंबियांचा शासकीय रुग्णालयात आक्रोश ; जळगाव रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) –  शहरातील देवकर फार्मसी कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून २० वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात कॉलेजच्या प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत विद्यार्थी श्याम प्रभाकर पाटील (वय २०) हा जळगाव येथील श्री. गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी कॉलेजचे प्राचार्य योगेश पवार यांनी त्याला विनाकारण त्रास देत असल्याचे आणि वारंवार अपमानित करत असल्याचे श्यामने आपल्या कुटुंबियांना सांगितले होते. १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी श्यामने आपल्या वडिल व काकानां फोन करून  सांगितले की, “प्राचार्य योगेश पवार यांनी मला  माझा दोष नसताना मला पाईप ने मारहाण केली. ज्यांचा दोष आहे त्यांना काहीच बोलले नाही” वडिल व काकांनी त्याची समजूत काढली मात्र प्राचार्यांच्या  त्रासामुळे श्याम प्रचंड मानसिक दडपणाखाली होता.

शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी श्यामने दौलत नगर येथील रुमवर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट (चिठ्ठी) जप्त केली आहे. या चिठ्ठीत त्याने प्राचार्य योगेश पवार यांच्या  मारहाणीमुळे जिवन संपवत असल्याचे स्पष्ट उल्लेख केला असून, त्यांच्यामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. मृत श्यामचे वडील प्रभाकर गोपाळ पाटील (रा. मु.बोदवड, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसांनी प्राचार्य योगेश पवार यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करत आहेत. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळजनक उडाली असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि कॉलेजमधील शिस्तीच्या नावाखाली होणाऱ्या छळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

“माझा मुलगा अभ्यासात हुशार होता, पण प्राचार्यांनी त्याला इतके मानसिक त्रास दिले की त्याला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. दोषींवर कडक कारवाई व्हावी,” अशी मागणी श्यामच्या वडिलांनी केली आहे.


 

 

Tags: #ramanandpolice #crime #jalgaon
Previous Post

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

Next Post

कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार
1xbet russia

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ
1xbet russia

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या
1xbet russia

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

April 4, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोरा जवळ भीषण अपघात; नाशिकचे अमित कायटे यांचा मृत्यू

April 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon