आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सांगता
जळगाव ( प्रतिनिधी ) – निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी भारतीय जनता पक्षाचे प्रभाग ७ ‘ड’ चे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीने संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता. या रॅलीला मिळालेला प्रचंड जनसमुदाय अत्तरदे यांच्या विजयाचा विश्वास अधोरेखित करणारा ठरला. आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना आ.भोळे यांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी चंद्रशेखर अत्तरदे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला होता. या रॅलीत प्रभाग ७ मधील इतर भाजप उमेदवार दीपमाला मनोज काळे, अंकिता पंकज पाटील आणि विशाल सुरेश भोळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने मतदारांना साद घातली, ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात मनोज भंडारकर, चेतन तिवारी, बंटी नेरपगार, प्रवीण महाजन, पंकज पाटील, नितीन पाटील, नितीन नन्नवरे, मनोज काळे, वैभव भोंबे, योगेश पाटील, कमलेश पाटील, सचिन चौधरी, आकाश चौधरी, विकास पवार, कृष्णा फेगडे, गौरव भोंबे, मयूर भोळे, माधुरी अत्तरदे, सविता बोरसे, सुरेखा चौधरी, रजनी भोंबे, कांचन भोंबे, ज्योती महाजन, ज्योती पाटील, रंजना पाटील, नितिका पवार आदींनी सहभाग घेतला.
प्रचार रॅली शिव कॉलनी, आशा बाबा नगर, शामराव नगर, पंडितराव कॉलनी आदी मार्गावरून गेली. त्या ठिकाणी नागरिकांनी उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. महिलांनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. मतदारांचा हा उत्साह पाहता, प्रभाग ७ मध्ये भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे.










