धानोरा ता.चोपडा ( वार्ताहर ) – चोपडा शहरातील नामांकित पंकज महाविद्यालयात प्रा.शामसिंग वळवी यांना नुकतीच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली
सातपुडा पर्वतातील अतिशय दुर्गम भागातून येत अगतदी प्रतिकुल परिस्थितीतून मार्ग काढत आधी आश्रम शाळा व शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीगृहातून महाविद्यालयात प्रवेश मिळवल्यानंतर पदवी ,नंतर एमफील व नेट परिक्षा उत्तीर्ण करत चोपडा येथील नामांकित पंकज महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या शामसिंग रामसिंग वळवी यांनी:कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव मानव्यविद्या समाजशास्त्र शाखे अंतर्गत “नंदुरबार जिल्ह्यातील भिल्ल जमातीतील स्त्रियांच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचा समाजशास्त्रीय अभ्यास” या विषयात संशोधन करत शोध प्रबंध यशस्वीरित्या पूर्ण केला.म्हणुन त्यांना नुकतीच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांच्या हस्ते सपत्नीक पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.याकामी त्यांना प्रा.डॉ.सुनील अजाबराव पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तर प्रा.डॉ.डी.एल. तोरवणे व प्रा. डॉ. ए. एस. पैठणे व प्रा.डॉ. सुनील पाटील यांचे
प्रोत्सान मिळाले त्यांच्या या यशाबद्दल पंकज शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले,पंकज शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पंकज बोरोले, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.आर.अत्तरदे प्राध्यापक वृंद चोपडा तालुका ग्रामसेवक संघटनेच्या उपाध्यक्षा सरिता पाडवी.यांनी अभिनंदन केले आहे.

फोटो कॅप्शन …
कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांच्या हस्ते पीएचडी पदवी प्रमाणपत्र स्विकारताना प्रा.शामसिंग वळवी दिसत आहेत.









