जामनेर (प्रतिनिधी) – शहरातील पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाचे प्रा.किशोर आनंदा पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज चे सहाय्यक प्रा.डॉ.पवित्रा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. गिरीश महाजन, नगराध्यक्षा साधनाताई महाजन,उमवि व्यवस्थापन परिषद मंडळ सदस्य दिपक पाटील,संस्थेचे संचालक जे.के.चव्हाण,प्रवीण डांगी प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी,सचिव कडू माळी यांनी प्रा. किशोर पाटील यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.








