जळगांव ( प्रतिनिधी ) :- खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील इलेक्ट्रानिक्स अँड कॉम्पुटर इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. हेमंत अशोक वाणी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगांव या विदयापीठाने पीएच.डी प्रदान केली.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांचे हस्ते पीएच.डी प्रदान करण्यात आली. सुरक्षित ऑनलाईन प्रमाणीकरण आणि दस्तऐवजासाठी ऑनलाईन स्वाक्षरी ओळख या विषयावर प्रबंध सादर केला. हा प्रबंध अत्याधुनिक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग मॉडेलचा वापर करून ऑनलाईन ऑफलाइन स्वाक्षरी ओळख एकत्र करणाऱ्या मजबूत हस्तलिखित स्वाक्षरी पडताळणी प्रणालीच्या डिझाईन आणि विकासावर केंद्र लक्ष केंद्रित करते. डिजिटल आणि भौतिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी हा शोधनिबंध हस्तलिखित स्वाक्षरी पडताळणीवर प्रकाश टाकतो. त्यांना डॉ.के.पी. राणे व्.डॉ. व्ही. एम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा हेमंत अशोक वाणी यांच्या यशाबददल त्यांना प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी अभिनंदन केले.