सोलापूर ;- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता पुण्यापाठोपाठ सोलापूर शहरातही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 16 ते 26 जुलै असे 10 दिवस हा लॉकडाऊन असेल अशी घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे. राज्यात आणि देशात अडीच महिने लॉकडाऊन होता. त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनलॉक सुरू झाल्यानंतर गर्दी वाढली. त्यामुळे रुग्णांची संख्याही (Corona Patient) वाढली आहे. सोलापूरमध्ये आत्तापर्यंत 3075 रुग्ण निघाले आहेत.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसत असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या काळात फक्त मेडिकल आणि इतर काही दुकानेच सुरू राहणार आहेत.