जळगाव (प्रतिनिधी) – कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मधील भोंगळ कारभार व गैर कारभाराची वेळोवेळी तक्रार वरिष्ठाकडे करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने आज जिल्ह्यात दौऱ्यावरती आलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या फार्म हाऊसवरती भेट घेऊन महाविकास आघाडीचे सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, माजी सिनेट सदस्य अतुल कदमबांडे, राष्ट्रवादी महानगर सचिव अँड. कुणाल पवार, एन एस युआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, राष्ट्रवादी फार्मसी विद्यार्थी संघटना अध्यक्ष भूषण भदाने, विद्यार्थी युवा सेना कार्यकर्ता अंकित कासार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
निवेदनात देण्यात आलेले खालील मुद्दे
1) संघ प्रचारक राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी.
2) तक्रार निवारण समितीचे चेअरमन न्यायमूर्ती श्री व्यवहारे यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा का दिला..? याची चौकशी व्हावी.
3) वित्त अधिकारी श्री कराड यांना विद्यापीठाने अचानक का काढून टाकले..? याची सखोल चौकशी व्हावी..
4) विद्यापीठाने कुठलीही निविदा न काढता एक कोटीचे बीएसएनएल टेंडर यामधील सत्यता व लपलेल गुढ नेमकं काय आहे..? याबाबतची चौकशी व्हावी..
5) कुलसचिव वित्त अधिकारी व अभ्यास मंडळावरील इतर नियुक्त्या तात्काळ करण्यात यावे.
6) विद्यापीठातील नोकर भरती गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी.
7) कुलसचिव बी बी पाटील यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती का घेतली..? याची चौकशी करण्यात यावी.
आशा तक्रारींचे निवेदन ना. उदय सामंत यांना देण्यात आले. या संदर्भात चौकशी करून कारवाईचे आश्वासन ना. उदय सामंत यांनी दिले आहे.